वित्त विधेयक लोकसभेमध्ये झाले मंजूर, अंतरिम बजेट 2024-25

वित्त विधेयक लोकसभा 2024

2024-25 या आर्थिक वर्षासाठी लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सदर केले. या अर्थसंकल्पाचा अभ्यास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वित्त विधेयक 2024 यशस्वीपणे मजूर केले. या अर्थसंकल्पामध्ये कर रचनेत कोणताही बदल केला गेलेला नाही, कारण या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुका संपल्यानंतर जुलै महिन्यामध्ये अंतिम अर्थसंकल्प सदर केले जाईल.

केंद्र शासनाच्या 2024-25 च्या 47.66 लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्पाला लोकसभेने मंजुरी दिली. सोबतच अनुदानाच्या पुरवणी मागण्यांच्या दुसऱ्या तुकडीलाही मंजुरी दिली.

येणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात सरकारला चार महीन्यांच्या खर्चाचा अधिकार देऊन विनियोग विधेयकाला सभागृहाने मंजुरी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या