Paytm Payments Bank चे CEO विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा

Vijay Shekhar Sharma Paytm

Paytm Payments Bank आणि डिजिटल बँकिंग च्या दृष्टीने एक महत्वाच्या घडामोडीत Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांनी Payments बँकेचे नॉन-कार्यकारी अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य म्हणून आपल्या भूमिकेचा राजीनामा दिला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून करण्यात आलेली कारवाई आणि 15 मार्चपर्यंत कामकाज बंद करण्याच्या देण्यात आलेल्या निर्देशानंतर हे पाऊल उचलले आहे. RBI च्या निर्देशाला प्रतिसाद म्हणून बँक मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

मंडळाच्या पुनर्रचनेसोबतच विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा

बँकेच्या कामकाजातील प्रशासन आणि स्वातंत्र्याबाबत आरबीआय मार्फत उपस्थित करण्यात आलेल्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी  Paytm Payments Bank कडून आपल्या मंडळाची पुनर्रचना केली जात आहे, ज्यामध्ये कार्यकारी संचालकाच्या पूर्ण स्वातंत्र्याचा समावेश आहे.

यामुळेच One97 Communication Limited (OCL) चे प्रतिनिधित्व करणारे विजय शेखर शर्मा यांना पेटीएम पेमेंट्स बँकेचे गैर-कार्यकारी अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा दिला असला तरी Paytm पेमेंट्स  बँकेत विजय शेखर शर्मा यांचा 51% हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा Paytm ची मूळ कंपनी One97 यांच्याकडे आहे.

हे पण वाचा : भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये वाढ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या