अरबी बिबट्याचा आंतरराष्ट्रीय दिवस निश्चित, काय आहेत उद्दिष्ट्ये

International day of arabian leopard

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 10 फेब्रुवारी हा दिवस अरबी बिबट्याचा  आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित/चिन्हांकित  केला आहे. अरबी बिबट्याच्या सध्याच्या  स्थितीमुळे IUCN रेड लिस्टमध्ये गंभीरपणे धोक्यात आल्याने रेझोल्यूशन 77/295 मध्ये हा औपचारिक निर्णय देण्यात आला.

अरबी बिबट्याची झपाट्याने होणारी घट हि जागतिक स्तरावर पर्यावरणास धोक्यात आणणाऱ्या जैवविविधतेच्या संकटांना तोंड देण्यास ठोस निर्णयांची गरज दाखवून देते.

अरबी बिबट्या आणि जैवविविधता

अरबी द्वीपकल्पातील समृद्ध जैवविविधतेचा दिवा म्हणून अरबी बिबट्याला ओळखले जाते. ही प्रजाती बिबट्याच्या सर्वात लहान उपप्रजातींपैकी एक असून सरासरी नरांचे वजन 30-40 किलोग्रॅम  तर मादी 25-30 किलोग्रॅम असते. आता सौदी अरेबिया, ओमान, येमेन आणि संयुक्त अरब अमिरातीत संकुचित झालेला हा प्राणी एकेकाळी संपूर्ण अरबी व्दीपकल्पात पसरलेला होता. शहरीकरण, शेती, शिकार आणि अवैध वन्यजीव व्यापार  यांमुळे या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय दिवसाची उद्दिष्ट्ये 

अरबी बिबट्याचे संवर्धन 

बिबट्याचे संरक्षण करून परिसंस्थेतील लवचिकता टिकवण्यासाठी तसेच एकंदरीत जैवविविधतेचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून हा अरबी बिबट्या आंतरराष्ट्रीय दिवस चिन्हांकित करण्यात आलेला आहे. अरबी राज्ये, एनजीओ, युएएन एजन्सींना बिबट्याचे परिसंस्थेमधील महत्व पटवून संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देणार आहे.

जागतिक प्रतिबद्धता 

या ठरावाद्वारे अरबी बिबट्या आणि इतर धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी प्रादेशिक उपक्रमांना चालना देऊन संवर्धनासाठी सहयोगाची दृष्टीने आधार देतो. बिबट्यांच्या संख्येत होणारी घट पुनर्स्थितीत आणून पर्यावरणाच्या एकूण फायद्यासाठी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागास प्रोत्साहन देते.

संवर्धनामधील प्रयत्न आणि अडचणी 

अरबी बिबट्याच्या अधिवासाचे संरक्षण करून त्याचे अस्तित्व प्रभावी बनविणे, नैसर्गिक शिकार संख्येच्या तुलनेत पूर्व स्थितीत आणणे,  मानव - बिबट्या संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शिक्षणावर भर देणे, कायद्याचे संरक्षण असूनही कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करून बिबट्याच्या संख्यामध्ये वृद्धीच्या दृष्टीने सुधारणे करणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या